सोलापूर – भवानी पेठ मड्डी वस्ती येथे सम्यक बुद्ध विहाराचा ८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला .
सुरुवातीस विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर पुष्प अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली.
मंडळाचे संस्थापक के डी कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला , यावेळी माजी पक्षनेता शिवानंद पाटील , माजी नगरसेवक अमर पुदाले , राजू पाटील तसेच पीआरपी राज्य उपाध्यक्ष राजा इंगळे , आरपीआय (गवई) प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे , D K सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ कसबे, प्रा. नारायण बनसोडे, राजा सोनकांबळे, ए डी कांबळे, चांगदेव सोनवणे, भालचंद्र साखरे, सुनील कांबळे, नेहाल चवरे, निशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केतन कांबळे, लखन येरवडे, दयानंद डावरे, विनोद कांबळे, ज्ञानेश्वर तिकोटे, तानाजी गायकवाड, संतोष सोनवणे, कांचन कांबळे, जनार्दन मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.



















