सोलापूर : तक्रारदार यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायदानुसार विजापूर नाका पोलीस ठाणे येथे अर्ज दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये मदत करून गुन्हा दाखल न करण्यासाठी युवराज भिमराव राठोड व साजन रमेश हावळे यांनी तक्रारदाराची भेट घेऊन विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे त्यांच्या चांगल्या परिचयाचे असल्याचे भासवून सदर पोलीस निरीक्षकांना रक्कम देण्यासाठी रुपये रु. 1,50,000/- ची तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत विभागाकडे आरोपी युवराज राठोड व साजन हावळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती. तक्रारदाराकडून विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाच्या नावे आरोपींकडून रक्कम रुपये 1,50,000 /- ची लाचेची मागणी केली गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर प्रकरणात सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एन. पांढरे सोऻ यांनी आरोपी युवराज राठोड व साजन हावळे यांना प्रत्येकी रक्कम रुपये ३०,०००/- च्या जामिनावर मुक्त केले.
यात आरोपी युवराज भीमराव राठोड व साजन रमेश हावळे यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओंकार परदेशी, ॲड. सोनाली कोंडा, ॲड. लता कॅरमकोंडा यांनी तर सरकार पक्षातर्फे श्रीमती क्यातम यांनी काम पाहिले.



















