Sunday, May 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ZP SOLAPUR | महाआवास अभियान ग्रामीण २०२०-२१ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यास तीन पुरस्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 November 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : अमृत महाआवास अभियान सन २०२२-२३ संपुर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे त्या अभियानाचा शुभारंभ व महाआवास अभियान ग्रामीण २०२० २१ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते २४ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० ‘वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. सदर महाआवास अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये सोलापूर जिल्हयास खालीलप्रमाणे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

१) मंजुर घरकुलांना स्वतःचे घरकुल बांधण्याकरीता शासनाकडून निधी उपलब्ध होतो परंतु सदर निधी हा पुरेसा नसल्याने लाभार्थी नाविण्यपुर्ण घरकुले उभारू शकत नाही त्यामुळे महाआवास अभियान २०२०-२१ यामध्ये लाभार्थ्यांना नाविण्यपुर्ण घरकुले बांधता यावीत यासाठी शासनाने वित्तीय संस्था, स्वंयसेवी संस्था यांच्या माध्यमातुन लाभार्थ्यांना कर्ज स्वरूपात रक्कम मिळवून देण्याबाबतचा उपक्रम संपुर्ण राज्यभरात राबविण्यात आला त्यामध्ये सोलापूर जिल्हयाने मोठया प्रमाणात घरकुल लाभाथ्र्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्था, स्वयंसहाय्यता समुह इ.च्या माध्यमातून कर्ज मिळवून दिलेले आहे. त्यामुळे या उपक्रमामध्ये सोलापूर जिल्हयास राज्यस्तरावरील तृतीय क्रमांकांचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

२) कॉर्पोरेट संस्था, स्वंयसेवी संस्था आणि सहकारी संस्था यांचे सहकार्य घेणे. यामध्ये सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यात बांधण्यात आलेल्या डेमो हाऊस ( नमुना घरकुल) यामध्ये घरकुल कसे असावे याकरीता जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी डेमो हाऊस बांधण्यात आले त्याकरीता निधी हा अपुरा पडत असल्याने आय डी बी आय बँक शाखा माळशिरस यांनी त्यांच्या सीएस आर निधीतून र.रू. १,०३०००/- (अक्षरी र.रु. एक लाख तीन हजार) इतका निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचबरोबर जिल्हास्तरीय डेमो हाऊस करीता बैंक ऑफ इंडिया रिजनल विभागाने र.रू. २,६०,०००/- इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. सी एस आर मधून जास्तीत जास्त निधी मिळविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर राहीला आहे याची दखल घेऊन सोलापूर जिल्हयास राज्यस्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

३) विशेष पुरस्कार: तालुका डाटा एन्ट्री ऑपरेटर

माळशिरस तालुक्यात तालुका डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी वेळेवर लाभार्थ्यांना मंजुरी देणे लाभार्थ्यांना हफ्ते वितरीत करणे, करारनामे करून घेणे व घरकुले पुर्ण करून घेणे यामध्ये सोलापूर जिल्हयात माळशिरस तालुका अग्रेसर ठेवून उत्कृष्टरित्या काम केलेले आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यातील तालुका डाटा एन्ट्री ऑपरेटर सुभाष स्वामी यांना विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.

घरकुले पुर्ण करणे, नाविण्यपुर्ण घरकुलांचे बांधकाम करीत असताना नाविण्यपुर्ण संकल्पना राबविणे (उदा. पर्यावरणपुरक साहित्याचा वापर करणे), सी एस आर निधी उपलब्ध करणे इ.कामी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व तत्कालीन प्रकल्प संचालक अर्जुन गुंडे व संतोष धोत्रे यांनी सातत्याने मार्गदर्शन व पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्यामुळे सोलापूर जिल्हयास राज्यस्तरावरील तीन पुरस्कार प्राप्त झाले असल्याची माहिती प्रभारी प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी यांनी दिली.

SendShareTweetSend
Previous Post

पोलीस निरीक्षकाच्या नावाने दीड लाख रुपये लाच मागणारे युवराज राठोड व साजन हावळे यांना जामीन

Next Post

गायरान जमिनीवरील अतिक्रमण ; प्रश्नावर प्रकाश आंबेडकर उतरले मैदानात ; मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गायरान जमिनीवरील अतिक्रमण ; प्रश्नावर प्रकाश आंबेडकर उतरले मैदानात ; मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979627
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group