सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला ; युवा भिमसेना का झाली आक्रमक
सोलापूर : परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात युवा भीमसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला.
हे आंदोलन युवा भीमसेनेचे अध्यक्ष महेश डोलारे यांच्या नेतृत्वाखाली झाले यावेळी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डोलारे यांनी परभणी घटनेचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार हे आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठी षडयंत्र रचत आहे असा आरोप करत या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली.