सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीसाठी मुख्यालयात प्राथमिक शिक्षकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
अनेक वर्षापासून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुखांची पदोन्नती रखडली होती. 2014 पासून पदोन्नती झाली नव्हती दीड वर्षांपूर्वी पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला मात्र काही शिक्षकांनी हाय कोर्टात स्टे आणल्यामुळे पुन्हा एकदा रखडली. अनेक दिवसाच्या संघर्षानंतर सोमवारी आखे तो दिवस उजाडला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, मुख्य वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मीरकले यांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख पदोन्नतीचे समुपदेशन घेण्यात आले.
केंद्रप्रमुखाच्या 81 जागेसाठी संबंधित शिक्षक हा बी ए बी एड असावा, त्याने सहा वर्ष पदवीधर म्हणून सेवा केलेली असावी ही पात्रता होती. विज्ञान 33, समाजशास्त्र 24, इंग्रजी 17, हिंदी सहा, उर्दू एक अशा 81 जागेसाठी 151 पात्र शिक्षकांनी समुपदेशनाला हजेरी लावली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती पात्र झालेल्या शिक्षकांना लवकरच केंद्रप्रमुख पदाची नियुक्ती देण्यात येणार आहे.