सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या माध्यमिक शिक्षण विभाग चर्चेचा विषय बनला आहे. शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्या कार्यभारावर अनेकांची नाराजी आहे. कार्यालयात हजर नसतात, इतर विविध शाळांमध्ये बसून फायलींवर सह्या करतात.
अशातच ते आता 15 दिवस रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा चार्ज कुणाला मिळणार अशी चर्चा मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये होती. उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे की सुधा साळुंखे असा प्रश्न होता. शेवटी शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार मिळविण्यात सुलभा वठारे या यशस्वी झाल्या आहेत.
वठारे या आता 15 दिवस माध्यमिकच्या बॉस असणार आहेत. साळुंखे ऐवजी वठारे यांनाच पदभार मिळण्यामागील सूत्रधार कोण अशी चर्चा आता जिल्हा परिषदेच्या आवारात रंगली आहे.
शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची नियुक्ती होण्यापूर्वी सुलभावटारे यांनी बरेच महिने माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याचा पदभार सांभाळलेल्या असून त्या पदावर कामकाज करण्याचा चांगला अनुभव त्यांना आहे.