सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांची नियुक्ती सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी झाल्याची माहिती समोर येत असून याबाबत कारंजे यांच्याकडूनच दुजोरा मिळाला आहे.
संदीप कारंजे हे 2005 ते 2018 पर्यंत सहाय्यक अभियंता पदावर काम केले दरम्यान ते तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे कार्यालयीन सचिव म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते सोलापूर महापालिकेच्या नगर अभियंता पदी पूर्ण वेळ नियुक्ती झाली. त्या पदावर ते चार वर्षे आहेत तसेच त्यांनी स्मार्ट सिटीच्या तांत्रिक विभागातील एका पदावर ही काम केले आहे.
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर काम करण्यासाठी नगर अभियंता पदावर किमान दहा वर्ष कामकाज पाहिले पाहिजे अशी प्रशासकीय अट आहे मात्र कारंजे यांनी सहा वर्षे या पदावर काम केल्याने त्यांना काही वर्षे शिथिलता देण्यात आली आणि ते अतिरिक्त आयुक्त या पदासाठी पात्र ठरले अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी सुद्धा अतिरिक्त आयुक्त या पदासाठी संदीप कारंजे यांची शिफारस शासनाकडे केली होती. संदीप कारंजे हे सोलापूरचे रहिवासी आहेत. सोमवारी कारंजे हे अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार घेणार असल्याची माहिती मिळाली.

















