आता रिक्षा रिक्षातून होणार ‘चेतन भाऊंची मार्केटिंग’ ; शहर मध्य मधील रिक्षाचालकांचा काँग्रेस उमेदवार नरोटे यांना पाठिंबा
सोलापूर : सोलापूर शहर मध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन नरोटे यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत जात आहे त्यांनी प्रचारांमध्ये सुद्धा आघाडी घेतल्याचे पाहायला मिळते.
गुरुवारी सोलापूर शहर मध्ये या मतदारसंघातील रिक्षा चालकांच्या संघटनेने काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुमारे 300 ते 400 रिक्षाचालक होम मैदानावर जमले होते. या सर्वांनी एकत्रित येऊन काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत चेतन नरोटे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता प्रत्येक रिक्षाचालक निश्चितच काँग्रेस उमेदवार नरोटे यांची मार्केटिंग या मतदारसंघात करताना पाहायला मिळेल.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, रिक्षा चालक हे कुठल्या एका धर्माचे नसतात. ते सर्व धर्माचे आहेत. त्यांच्यातच सर्वधर्मसमभाव पाहायला मिळतो आणि काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांना पाठिंबा दिल्याने मी त्यांचे आभार व्यक्त करते. आपल्या देशाला जी भारतीय जनता पार्टीची कीड लागली आहे ती कीड या निवडणुकीत काढून टाकावी असे आवाहन मी सर्व रिक्षा चालकांना करते.
उमेदवार नरोटे यांनी सर्व रिक्षाचालकांचे आभार व्यक्त केले. प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत सर्व रिक्षाचालकांनी पाठिंबा दिला तो दिवस मी कधी विसरणार नाही. सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड हे रिक्षा चालकांचे मोठे थांबे आहेत आणि शहर मध्य मधूनच रिक्षा चालकांची वहिवाट आहे. ज्याप्रमाणे प्रणिती ताई यांना निवडून आणला, त्याचप्रमाणे एका मिल कामगारांच्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन केले.