दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून यंदाचे सरपंच पदे जनतेतून असल्याने त्याच पदासाठी सर्वत्र चुरस दिसून येत आहे .
मंद्रूप सरपंच पदासाठी गावच्या विकासासाठीच सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याचे मत राष्ट्रवादीच्या मीनाक्षी टेळे यांनी व्यक्त केले. टेळे यांनी बाउन्सर सोबत घेऊन आपला सरपंच पदाचा अर्ज भरल्याने तो नार्थकोट प्रशालेत चर्चेचा विषय बनला होता आणि ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मीनाक्षी टेळे म्हणाल्या, दक्षिण तालुक्यात मंद्रूप हे सर्वात मोठे गाव असून गावातील पाच नंबर वार्डात म्हणावे तसा विकास झाला नाही रस्ते, दिवाबत्ती, पाण्याची टंचाई, बेरोजगारी असे प्रश्न आहेत. तरुणांसाठी व्यापारी संकुलन गाळे नाहीत अशा अनेक मूलभूत सुविधा पासून मंद्रूप गाव वंचित आहे. यंदाच्या वेळेस गावचा विकास करण्यासाठी सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याचा मनोदय राष्ट्रवादीच्या मीनाक्षी टेळे यांनी यावेळी व्यक्त केला…


















