सोलापूर : उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या माजी सभापती रजनी भडकुंबे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
सालाबादप्रमाणे यंदाही सभापती चषक पर्व दुसरे स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आणि हगलूर येथील राजर्षी शाहू नगर मधील कमान उदघाटन व भीमनगर मधील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टरचे देखील उदघाटन दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते हस्ते संपन्न झाले. आपल्या भाषणात दिलीप माने यांनी मजेशीर फटकेबाजी केली ते काय म्हणाले पहा हा व्हिडीओ
सभापती चषक क्रिकेट स्पर्धेत SJ गुळवंची संघाने वडाळा संघास नमवून प्रथम पारितोषिक पटकवला. या कार्यक्रमांस पृथ्वीराज माने युवा मंच तालुकाध्यक्ष सुनील जाधव, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, सरपंच अरिफा पठाण, ग्रामसेवक राजकुमार साबळे, सिद्धार्थ गायकवाड, राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, चेअरमन श्रीशेल रणधीरे, राजू शिंदे, माजी केंद्रप्रमुख भालेराव, श्रीरंग मगर, ग्रामपंचायत सदस्य शाम शिंदे, अमित भडकुंबे, अतुल मस्के अनिल शिंदे, साहेबराव शिंदे, बबन शिंदे, अभिजित भडकुंबे, अविनाश बनसोडे, शशिकांत गायकवाड, किरण गायकवाड पाटलोजी जानराव, SB प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.



















