सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी धन्यकुमार काळे, कनिष्ठ सहाय्यक यांची तर सरचिटणीस पदी मच्छिन्द्रनाथ मस्के, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची निवड करणेत आली.
पंचायत समिती पंढरपूर येथे झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या सभेमध्ये महासंघाच्या या निवडी करणेत आल्या. यावेळी कार्याध्यक्ष म्हणून कनिष्ठ अभियंता आर एम आतार, उपाध्यक्ष पदावर ग्रामसेवक एस एन इंगोले, प्रसिद्धी प्रमुख आर एम डोईजोडे, महिला उपाध्यक्ष पदावर अर्चना खांडेकर, महिला प्रतिनिधी म्हणून वंदना पंडित, श्रीमती हंबीर, कोषाध्यक्ष पदावर मकरंद देशपांडे, सहसचिव पदावर पशुधन पर्यवेक्षक आर बी मोहिते, संघटक पदावर मंगेश शिंदे, सल्लागार म्हणून कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रफुल्ल माळी, गुरु जाधव, सुनंदा सुरवसे यांची सर्वनुमते निवड करणेत आली.
यावेळी जिल्हा महासंघाचे दिनेश बनसोडे, राजेश देशपांडे, सचिन मायनाळ, आनंद साठे, विजय कुलकर्णी, प्रमोद धावड, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रफुल्ल माळी, लेखाधिकारी गुरु जाधव, परिचर संघटनेचे राज्य पदाधिकारी नितीन भालके, नर्सेस संघटनेचे सुनंदा सुरवसे, लिपीक वर्गीय संघटनेचे दत्तात्रय लवटे, समीर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद धावड यांनी केले तर आभार प्रफुल्ल माळी यांनी मानले. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश गोडसे, लेखा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गुरु जाधव, नि. प्रशासन अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल माळी, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे लक्ष्मण वंजारी यांनी शुभेच्छा दिल्या.

















