सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले सोलापूरचे मोठे राजकीय नेते महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांचा शाही विवाह सोहळा रविवारी सोलापुरात पार पडला. या विवाह सोहळ्याला सर्वपक्षीयसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मोठी उपस्थिती होती.
परंतु रविवारी झालेल्या प्रथमेश कोठे यांच्या विवाह सोहळ्यानंतर महेश कोठे यांच्यासह देवेंद्र कोठे, वर प्रथमेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गीतावर चांगलाच ठेका धरला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. पहा हा जल्लोषी व्हिडिओ

















