बार्शी | चिखर्डे गावातील दहा वर्षीय दिव्यांग संभव कुरुळे याचा मृत्यू झाला होता, याप्रकरणी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनी दिव्यांगाच्या न्यायासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, या चिमुकल्याच्या मृत्यूला जे कारणीभूत असतील त्याच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणीही केली आहे.
चिखर्डी गावातील कुरळे कुटुंबीय दिव्यांगाचा 5% निधी मिळावा यासाठी काही दिवसापासून प्रयत्न करत होते. तीन महिन्यापूर्वी त्याच कुटुंबातील वैष्णवी कुरुळे यांचा मृत्यू झाला होता, त्यावेळी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू अशा आश्वासन दिले होते.


















