Wednesday, March 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अभिनंदन ! माझी वसुंधरा अतंर्गत मंद्रुप ग्रामपंचायतीस एक कोटी रूपयाचा पुरस्कार ; राज्यात द्वितीय पुरस्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 







सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यांतील मंद्रुप ग्रामपंचायतीस माझी वसुंधरा अतंर्गत १ कोटी रूपयाचा पुरस्कार जाहिर केला आहे. माझी वसुंधरा मध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ही प्रथम तर मंद्रुप ग्रामपंचायत राज्यात द्वितीय आली आहे. ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांचे व त्यांच्या टीमचे या यशात मोठे योगदान आहे.


माझी वसुंधरा अभियान २० अंतर्गत उच्चत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षिस रकमेचे वितरण व बक्षिस रकमेच्या विनियोगाची कार्यपध्दती शासनाने निश्चित केली आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मंद्रुप ने राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सोलापूर जिल्हयात प्रथमच एक कोटी रूपये बक्षीस मिळविणारी मंद्रुप ग्रामपंचायत पहिली ठरली आहे. सिईओ दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी या साठी विशेष प्रयत्न केले.  मंद्रुप ग्रामपंचायतीने मोठे प्रयत्न करून विशेष कामगिरी केली आहे. 

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने 

शासन निर्णय क्रमांक दिनांक: ०५ डिसेंबर २०२२ नुसार बक्षीसे जाहिर केली आहेत. 

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान २.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १६ एप्रिल, २०२१ ते दिनांक ३१ मार्च, २०२२ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान २.०० मध्ये राज्यातील ४०६ नागरी स्थानिक संस्था व ११,५६२ ग्राम पंचायती अशा एकूण ११.९६८ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.

. “माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत निर्गमित करण्यात आलेल्या टूलकिट नुसार डेस्कटॉप असेसमेंट करिता अमृत शहरांसाठी ६००० गुण, नगर परिषद, नगर पंचायत व मागील वर्षात सहभागी झालेल्या ग्राम पंचायतीसाठी ५५०० तर दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतींच्या गटासाठी ५०५० गुण ठेवण्यात आले होते. फिल्ड असेसमेंटसाठी दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतींचा गट वगळता इतर गटांसाठी २५०० गुण तर दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतींच्या गटासाठी २१५० गुण ठेवण्यात आले होते.

माझी वसुंधरा अभियान २० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोनही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान २.० मधील विविध ०५ गटातील विजेते तसेच, महसूली विभाग व जिल्हयाच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड करण्यात आली आहे. याबाबतचा निकाल दिनांक ५ जून २०२२ जाहिर करण्यात आला असून, गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकारी तपशील जाहिर केला आहे. 

या मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मंद्रुप ग्रामपंचायतीस १ कोटी रूपयाचे बक्षीस जाहिर करणेत आले आहे. 



पुरस्काराचा मनस्वी आनंद – सिईओ दिलीप स्वामी 

माझी वसुंधरा अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यांतील मंद्रुप ग्रामपंचायतीस १ कोटी रूपयाचा पुरस्कार शासनाने जाहिर केला आहे. यामुळे माझी वसुंधरा अभियानासाठी झटलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिलासा देणारी घटना आहे. काम केलेनंतर त्याची योग्य दखल घेणेत आली आहे. सोलापूर जिल्ह्यात माझी वसुंधरा साठी चळवळ उभी केली होती. त्याचे हे यश आहे. या साठी झटलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन अशी प्रतिक्रिया सिईओ दिलीप स्वामी यांनी दिली. 



शेळकंदे यांचा असाही योगायोग

ग्रामपंचायतत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी नाशिक येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता असताना नोडल अधिकारी म्हणून माझी वसुंधरा अभियाना साठी काम केले होते. त्यांनी पिंपळगाव बसवंत राज्यात पहिली आणली होती. सिईओ दिलीप स्वामी यांनी यास चळवळीचे रूप दिले व त्यास अनुभवाचे जोरावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी जोरदार अंमलबजावणी करून मंद्रुप ग्रामपंचायतीस यश मिळवून दिले आहे. ग्रामसेवक नागेश जोडमोटे व त्यांची सर्व टीम यांचे योगदान महत्वपुर्ण आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सावरकरांनी एक नाही तर पाच वेळा माफीनामा लिहून दिला, नंतर 24 वर्षे इंग्रजांविरोधात बोट उचलले नाही ; सोलापुरात माकप नेते अशोक ढवळे यांचा दावा

Next Post

सोलापुरात जावयाचा सासुवर खुनी हल्ला ; गंभीर जखमी सासुवर उपचार सुरू ; गुन्हा दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात जावयाचा सासुवर खुनी हल्ला ; गंभीर जखमी सासुवर उपचार सुरू ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973106
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group