Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात 8 जानेवारी रोजी आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन ; याविषयी होणार जनजागृती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 December 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,(प्रतिनिधी):- सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने रविवार दि. 8 जानेवारी रोजी आपटे डेअरी प्रायोजित सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यंदाच्या मॅरेथॉनमध्ये कचरा विलगीकरणसाठी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.स्वप्नील कोठाडीया आणि आपटे डेअरीचे अभिषेक आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या 6 वर्षापासून सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूर मॅरेथॉन यशस्वीपणे आयोजित करीत आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळातही नागरीकांना ऑनलाईन पध्दतीने व्हर्च्युअल मॅरेथॉनचे आयोजन करून शरीर सदृढ ठेवण्यासाठी विशेष मॅरेथॉन घेण्यात आली. कोरोना नंतरची ही मॅरेथॉन म्हणजे पुन्हा नव्याने सुरूवात आहे. मोठ्यासंख्येने यामध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी केली जात आहे. 21 किलो मिटर, 10 किलो मिटर आणि साडे तीन किलो मिटरची फन रन अशा तीन गटात ही मॅरेथॉन होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची सोलापूर मॅरेथॉन यंदा सोलापूरमधील सुप्रसिध्द सराफ व्यापारी आपटे यांनी नव्याने सुरू केलेल्या आपटे डेअरी या नव्या उद्योगाच्या सहकार्याने होणार असल्याने आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉन या नावाने ही मॅरेथॉन होणार आहे. 

दरवर्षी वेगवेगळी थिम घेवून सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते त्यानुसार यंदाच्या मॅरेथॉनमध्ये नागरीक तसेच शहर वासियांनी ओला आणि सुका कचरा विलगीकरण कसे केले पाहिजे त्यापासून कसा फायदा आहे याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. सोलापूर महानगर पालिकेने ठेवलेल्या या उद्देशात सोलापूर रनर्सचाही सहभाग राहणार आहे. यापुर्वी सोलापूर रनर्स असोसिएशनने स्वच्छतेवर आधारीत उपक्रम राबवला होता. त्यानंतरच्या मॅरेथॉनमध्ये हरित सोलापूर ही संकल्पना राबवून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला. सोलापूर मॅरेथॉन ज्या मार्गावरून होते तो मार्ग आंतरराष्ट्रीय मानांकना प्रमाणे असून या मार्गावरील दोन्ही बाजुला सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपन करून त्याचे योग्य ते संगोपन करण्यात आले आहे. 

मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, टाईम बीब, गुडी बॅग, सहभागी मेडल असे साहित्य पुरवण्यात येणार आहे तसेच मॅरेथॉनच्या मार्गावर पाणी, एनर्जी ड्रिंक, नाष्टा, तज्ञ डॉक्टरांची टीम आणि रुग्णवाहिका तसेच महिलां मुलींसाठी बायो टॉयलेटची सुविधा करण्यात येणार आहे.  सोलापूर मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी www.solapurmarathon.com   या वेबसाईटवर नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गेल्या 6 वर्षापासून सोलापूर मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्तालय, सोलापूर महानगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालय, आरोग्य विभाग वाहतुक विभाग, हरिभाई देवकरण प्रशाला, नूमवि प्रशाला यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

मॅरेथॉनचा मार्ग आणि वेळ – 

21 किलो मिटरचा मार्ग – ज्ञानप्रबोधीनी प्रशालेपासून सकाळी 5.40 वा. सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौक, भारती विद्यापीठ, डी मार्ट, टाकळीकर मंगलकार्यालय, विजापूर रोड मार्गे एसआरपीएफ मैदानापासून माघारी येवून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे. 

10 किलो मिटरचा मार्ग – ज्ञानप्रबोधीनी प्रशालेपासून सकाळी 6 वा. सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौक, भारती विद्यापीठ, जुळे सोलापूर संतोष नगर येथून माघारी येवून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे.   

3.5 किलो मिटरची फन रन मार्ग – ज्ञानप्रबोधीनी प्रशालेपासून सकाळी 7.30 वा. सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता येथून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे.  

सोलापूर रनर्सची टीम –

अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया, कार्याध्यक्ष डॉ. विश्वास बिराजदार, खजिनदार डॉ. योगेश जडे, रेस डायरे्नटर डॉ. विक्रम दबडे, माजी अध्यक्ष डॉ. यशवंत पेठकर, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. भास्कर पाटील, डॉ. नितीन बलदवा, डॉ. गोरख रोकडे, डॉ. गुरू जालीमिंचे, डॉ. किरण किणीकर, डॉ. महेश बिलुरे, डॉ. प्रदीप भोई, डॉ. सुभाष भांगे, अभय देशमुख, अजित वाडेकर, बसवराज    , संजय सुरवसे, जयंत होलेपाटील, श्रीनिवास संगा, स्वप्नील नाईक, रोषण भुतडा, ओंकार दाते, डॉ. विठ्ठल कृष्णा

SendShareTweetSend
Previous Post

सरपंच पदाच्या निवडणुकीत पुतण्यासाठी चुलत्याची माघार ; दक्षिणच्या निंबर्गीत दुरंगी लढत ; या नेत्याची प्रतिष्ठा पणाला

Next Post

breaking : सोलापूर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी चेतन नरोटे यांची अधिकृत घोषणा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

breaking : सोलापूर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी चेतन नरोटे यांची अधिकृत घोषणा

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986291
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group