सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठातील वसतिगृहात राहणारी मूळची तुळजापूर तालुक्यातील केमवाडी इथे रहिवासी सानिया मियासाहेब पठाण वय 22 ही बेपत्ता झाली आहे. यासह सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झालेले शास्त्री नगर इथला रहिवासी रोहित नागनाथ चौघुले वय 19 व कुर्बान हुसेन नगर मध्ये राहणारा जमीर रहेमान पेरमपल्ली वय 30 हे घरातून निघून गेले असून त्यांचा शोध लागला नाही.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सानिया पठाण ही बेपत्ता झाल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाने दाखल केली आहे. सानिया ही विद्यापीठातील मातोश्री वसतिगृहात राहत होती. दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान इन आऊट रजिस्टर मध्ये नोंद करून सिंहगड येथे जाते म्हणून निघून गेली. सायंकाळी 7 वाजेपर्यंत परत आली नाही, हजेरी घेत असताना हे निदर्शनास आले. ही बाब जेव्हा वरिष्ठांना समजली तेव्हा मुलीच्या आई वडिलांना माहिती देण्यात आली. ती अद्याप परत आली नसल्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जमीर रहेमान पेरमपल्ली हा 29 नोव्हेंबर रोजी बार्शी येथे इजतेमा साठी जातो म्हणून घरातून निघून गेला आहे. तर रोहित नागनाथ चौघुले हा 5 डिसेंबर रोजी घरातून निघून गेला तो परत आलाच नाही.



















