मोठी ब्रेकिंग : दक्षिणमधून धर्मराज काडादी यांची उमेदवारी कायम ; दिलीप माने यांची माघार
सोलापूर : धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला माजी आमदार दिलीप माने सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर माजी आमदार दिलीप माने यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे ठरले आणि दिलीप माने हे धर्मराज काडादी यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत काडादी व माने हे एकत्रित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आले त्यांच्यासोबत इतर दक्षिणचे कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर प्रणिती शिंदे या जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी मीडियाला बोलणे टाळले. अधिक राजकीय माहिती घेतली असता समजले की, धर्मराज काडादी यांना काँग्रेसने पुरस्कृत उमेदवारी दिली आहे.
याबाबत दिलीप माने यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. धर्मराज काडादी यांच्या उमेदवारीने दक्षिण मध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. गंगा निवासस्थानी झालेल्या बैठकीत वेळी शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांनी उपस्थिती लावून काडादी यांना माघार घेण्याची विनंती केल्याचे समजते.