सोलापूर शहर उत्तर मधून अपक्ष संजय साळुंखे यांची माघार
अखिल भारतीय हिंदू महासभेचे संजय साळुंखे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आपला अपक्ष अर्ज दाखल केला होता हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरही त्यांनी टीका केली होती.
सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सर्वात प्रथम त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
माध्यमांशी बोलताना साळुंखे म्हणाले, मी माघार घेतली आहे आता कोणाला पाठिंबा द्यायचा याची तीन नंतर चर्चा होईल आणि मी माझी भूमिका स्पष्ट करेन. विजयकुमार देशमुख यांनी विचारले नाही, बोलले पण नाही, शहर उत्तर हा हिंदुत्ववादी बाले किल्ला आहे तो विचार तिथे जिवंत राहिला पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न आहे.
सुधीर बहिरवाडे म्हणाले, सकल हिंदू समाज एकत्र होऊन चर्चा केली, हिंदुत्ववादी मुद्दे आहेत, जो उमेदवार त्यावर चर्चा करेल, ते मुद्दे विधानसभेत मांडेल त्याला आम्ही पाठिंबा देणार अशी भूमिका मांडली.