सोलापूर, (दिनांक): जीवन ज्योती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीनाथ हायस्कूल शांतीनगर सोलापूर येथे, संस्थेअंतर्गत शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापक सातलिंग शटगार यांनी दिली.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, चिकित्सक वृत्तीला चालना मिळावी. या हेतूने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे डॉ. सचिन श्याम लढ्ढा, नवोपक्रम,नव संशोधन व साहचर्य यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.श्रीपाद नागनाथ सुरवसे सर उपाध्यक्ष जीवन ज्योती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर हे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून नीता येरमाळकर स. हि. ने. प्रशाला सोलापूरच्या मुख्याध्यापिका व सौ. प्रियांका आराध्ये माजी अध्यक्षा जिल्हा विज्ञान मंडळ सोलापूर हे उपस्थित राहणार आहेत.
या विज्ञान प्रदर्शनाचे विषय खालील प्रमाणे १) पर्यावरणात अनुकूल सामग्री २) आरोग्य आणि स्वच्छता ३) सॉफ्टवेअर आणि ॲप्स ४) वाहतूक व परिवहन ५) पर्यावरण व हवामान बदल ६) गणितीय मॉडेलिंग हे असून प्राथमिक व माध्यमिक गट असे स्वतंत्र गट असून विजेत्या स्पर्धकांस अनुक्रमे प्रथम क्रमांकास रोख रक्कम १००१₹, शील्ड, प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकास रोख रक्कम ७०१ ₹ शील्ड, प्रमाणपत्र, तसेच तृतीय क्रमांकास रोख रक्कम ५०१₹, शील्ड व प्रमाणपत्र असे बक्षीस ज्येष्ठ शास्त्रज्ञ भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबईचे व्यंकटेश गंभीर यांच्या हस्ते व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुलभा वठारे आणि साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका चैताली सागर सुरवसे मॅडम व देवराज प्राथमिक शाळेच्या सारीका श्रीपाद सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
या प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रदर्शन प्रमुख गिरीष शिंदे, संतोष बिराजदार, स्मिताराणी चिवटे, श्संतोष पवार, . बाबा बनसोडे,. अशोक विजापूरे, मल्लिकार्जुन कोळी, चंद्रकला कांबळे आदी प्रयत्नशील आहेत.
हे विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून बुधवार दिनांक १४/१२/२०२२ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन श्रीनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक सातलिंग शटगार व देवराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका सौ. अशाराणी डोके यांनी केले आहे.




















