सोलापूर : कॅनडा देशातून भारतात जगण्यासाठी भारतात आलेली प्रसिध्द नृत्यांगना व कलाकार नोरा फतेहीने फिफा विश्वचषक २०२२मध्ये भारतातचं प्रतिनिधीत्व करत ‘लाइट द स्काई अँथम’ या गाण्यावर परफॉर्म केलं त्याचवेळी नोरा फतेहीने तिरंगा उलट दिशेने म्हणजे हिरवा रंग सर्वात वर असलेल्या दिशेने पकडला होता. एवढंच नाही तर तिरंगा उचलत असतानाही चुकीच्या पद्धतीने उचलेला या व्हिडीओमध्ये दिसत आहे आणि त्यानंतर तिने तो एका व्यक्तीच्या दिशेने फेकलेला दिसत आहे.
https://fb.watch/hirewqGI_d/ ह्या लिंक च्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे. तरी राष्ट्रध्वजाचा जो अपमान नोरा फतेहीने “कतार” या देशात केलेला आहे त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. हे तिचे कृत्य म्हणजे राष्ट्राची प्रतिमा मालिन करणारे आहे. असे वक्तव्य यावेळी सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते यतिराज होनमाने यांनी केले.
“राष्ट्र प्रतिमा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 कलम -2″* नुसार नुरा फतेही वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय पाटील यांच्याकडे यावेळी विविध देशप्रेमी संघटनांच्या पदाधिकार्याकडून करण्यात आली.
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव समर्थ बंडे, अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे,भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश कबाडे,श्रीराम प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अर्जुन मोहिते, पुष्कर कोळी अक्षर पंचारिया आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





















