सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत गुरव समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील विजापूर रोडवरील नेहरूनगर मैदानावर हे अधिवेशन होणार आहे दुपारी चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन कार्यक्रम स्थळी होणार आहे. रविवारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर आगमन होणार आहे. नंतर ते शासकीय विश्रामगृह याठिकाणी येतील, तिथे सुमारे एक तास 15 मिनिटे त्यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला असून 3 वाजून 45 मिनिटांनी ते कार्यक्रम स्थळी निघतील.


















