सोलापूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या बाबत बदनामी कारक वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सर्वत्र निषेध केला जात आहे. त्यांचे पुतळे जाळले जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुध्दा होऊ लागली आहे.
सिव्हिल हॉस्पिटलच्या पोटफाडी चौकात असलेले भाजपच्या शहर कार्यालयासमोर युवा भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा पुतळा नेऊन त्याठिकाणी जाळण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे, विकास गायकवाड, हुसेन बागवान, सुनिल काळे हे उपस्थित होते. डोलारे म्हणाले, महामानवाबद्दल बदनामीकारक वक्तव्य थांबवा अन्यथा भाजपाच्या नेत्यांच्या तोडाला काळे फसण्याचा इशारा दिला.


















