सोलापूर : सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या पांडुरंग पवार परिवारातील आमरण उपोषणकर्त्यांची आमदार अमोल मेटकरी यांनी भेट घेतली.त्यावेळी आमदार मेटकरी यांनी भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासच्या कार्यकर्त्यांनी सुरु जिल्ह्यातील भ्रष्ट कारभाराविरुध्द धरणे आंदोलन करीत असलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन,या गंभीर प्रकरणात लक्ष घालून याप्रश्नी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले.
सोमवारी दि. ०५ डिसेंबरपासून पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी,सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील भ्रष्ट काराभाराच्या विरोधात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर धरणे आंदोलन सुरू केलंय.या उपोषणस्थळी सोगांव (पश्चिम) येथील पांडुरंग पवार कुटुंबियांनी, करमाळा तालुक्यातील भाजप नेत्याने त्यांच्या २७ दुभत्या गायी नेल्याप्रकरणी प्रशासनाने दखल नाही घेतल्याने आमरण उपोषण सुरू केलंय.
या आमरण उपोषणाचे माहिती मिळाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मेटकरी यांनी पवार कुटुंबीयांच्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्याप्रश्नी न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला.
पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी,धरणे आंदोलन सुरू केल्याचा शनिवारी,०६ वा दिवस होता. मात्र प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही.अशा स्थितीत आंदोलनाच्या ठिकाणी आमदार अमोल मेटकरी यांनी भेट दिली. यावेळी न्यासच्या वतीने आमदार मेटकरी यांना निवेदन दिले.
यावेळी आमदार अमोल मेटकरी यांनी न्यासचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कानगुडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली.
यावेळी न्यासचे गणेश बोड्डू, सुहेल शेख,ओंकार स्वामी, बाबूराव सोनवणे, मुकूल अडाकुल,राम रोतुल आणि न्यासचे कार्यकर्ते उपस्थित होते.


















