सोलापूर : सोलापुरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरव समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील इतर आमदार लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले गुरव समाजाच्या मुलांचे चांगले शिक्षण झाले पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना सोय रोजगार मिळून ती मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिले पाहिजेत त्यासाठी संत काशीबा युवा विकास योजना सुरू करण्याची घोषणा करत या योजनेसाठी प्रारंभी 50 कोटी रुपये निधी देणार अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.



















