सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 24 दिवस मसूरी या ठिकाणी ट्रेनिंग ला जाणार आहेत त्याचे अधिकृत पत्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी काढले. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्यासह राज्यातील 29 प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी मसूरी या ठिकाणी दिनांक 19 डिसेंबर ते 13 जानेवारी 2023 दरम्यान Mid career training program fhase 3 साठी 24 दिवसाची ही ट्रेनिंग होणार आहे. कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्या सल्ल्याने आपला पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे देऊन प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त व्हावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले राजेंद्र भारूड तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचाही या ट्रेनिंग कार्यक्रमात समावेश आहे.





















