Thursday, October 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काँग्रेस आक्रमक ; शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भाजप नेत्यांना दिला हा इशारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सातत्याने महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांवर कड़क कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन ताबड़तोब हटविण्यात यावे या मागणीसाठी सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत भाजपा नेत्यांचा निषेध केला यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणुन गेला होता.

यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी पावन झालेल्या महाराष्ट्रात असे दळभद्री भाजपा नेते सतत महापुरुषांचा अपमान करत आहेत याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. सातत्याने थोर महापुरुषांचा अवमानकारक वक्तव्ये करुन अपमान करणाऱ्या भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कड़क कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच याप्रकरणी चूकीची कारवाई करत अकरा पोलिसांना निलंबित करण्यात आले, तीन कार्यकर्त्यांसह एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आली ही कारवाई ताबड़तोब मागे घ्यावी.

पुढे बोलताना नरोटे म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले इतर महापुरुषांबद्दल सातत्याने वादग्रस्त व्यक्तव्ये करून अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन ताबड़तोब हटविण्यात यावे. भाजपा नेत्यांनी महापुरुषांचा अपमान करणे न थांबविल्यास रस्त्यावरुन फिरू देणार नाही. अवमानकारक, वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर ताबड़तोब कड़क कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नरोटे यांनी दिला.

यावेळी माजी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, प्रवीण निकाळजे, तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, नरसिंह आसादे, किसन मेकाले, गणेश डोंगरे, अंबादास गुत्तिकोंडा, सुनील रसाळे, उमेश सूरते, N K क्षीरसागर, अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, अँड केशव इंगळे, नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, राजन परदेशी, तिरुपती परकीपंडला, मधुकर आठवले, हसीब नदाफ, उपेंद्र ठाकर, अनिल मस्के, अप्पासाहेब बगले, रामसिंग आंबेवाले, राहुल वर्धा, सोहेल शेख, चक्रपाणी गज्जम, विवेक कन्ना, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, दीनानाथ शेळके, राजेन्द्र शिरकुल, दाऊद नदाफ, हारून शेख, संघमित्रा चौधरी, VD गायकवाड, सलीम मनुरे, अंजलीताई मंगोडेकर, जयप्रकाश पल्ली, मुन्ना वळसंगकर, आषुतोष वाले, श्रीकांत दासरी, प्रतीक शिंगे, चंदा काळे, सुभाष वाघमारे, रुकैय्याबानु बिराजदार, सायमन गट्टू, वसिष्ठ सोनकांबळे, दत्तात्रय नामकर, चंद्रकांत टिक्के, नागनाथ शावने, नरसप्पा चिंकाराम यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या खासदारांनी नाही तर कोल्हापूरच्या खासदारांनी मांडला संसदेत हा सोलापूरचा विषय

Next Post

ढाब्यावर दारू पिऊ नका रे…! 3 ब्लेंडर्स प्राईड, 2 बियर बाटल्यासह चौघांचा हातात बेड्या ; हॉटेल मालकाला न्यायालयाने ठोठावला एवढा दंड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ढाब्यावर दारू पिऊ नका रे...! 3 ब्लेंडर्स प्राईड, 2 बियर बाटल्यासह चौघांचा हातात बेड्या ; हॉटेल मालकाला न्यायालयाने ठोठावला एवढा दंड

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001338
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group