सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत तशी ऑर्डर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी मंगळवारी काढली.
बदल्या करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये राजेंद्र करणकोट, अश्विनी भोसले, शिवाजी राऊत व राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांचा समावेश आहे.
राजेंद्र करणकोट यांची जेलरोड पोलीस स्टेशन इथून जोडभावी पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली.
शिवाजी राऊत यांची जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातून येथून सुरक्षा शाखेत बदली करण्यात आली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या निरीक्षक अश्विनी भोसले यांची विशेष शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे तर राघवेंद्र सिंह क्षीरसागर यांची बदली विशेष शाखेतून सदर बजार पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.



















