सोलापूर : जिल्हा परिषद प्रशासनाची समन्वय सभा प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतल जाधव, समाज कल्याण अधिकारी सुनील कमीतकर, उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे, प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीर प्रभारी प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी कार्यकारी अभियंता कुलकर्णी, कृषी विकास अधिकारी कुंभार यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सीईओ दिलीप स्वामी हे जिल्ह्यातील दिव्यांग निधीबाबत गंभीर झाल्याचे पाहायला मिळालं. ते म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे, दिव्यांग सक्षम अभियानातून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये दिव्यांगाचा निधी शंभर टक्के खर्च झाला आहे का? याची दक्षता गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावी यासह विविध सूचना उपस्थितांना केल्या..




















