अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे ग्रामपंचायतच्यावतीने विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभ पार पडला. आमदार निधीतून श्री कलमेश्वर मंदिर सभा मंडप, पिरवल्लीसाहेब दर्गा सभामंडप तसेच सिमेंट काँक्रेट रस्ता भूमिपूजन समारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कल्याणशेट्टी यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कारात आमदार भारावून गेले, गावची एकी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सोसायटीचे चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि देवस्थान पंचकमिटी यांची एकी पाहून आमदारांनी लाखो रुपयाच्या विकास निधीची ग्वाही व्यासपीठावरून दिली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार निधीच्या माध्यमातून सुलेरजवळगीकरांना भरगोस असा विकास निधी दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सुलेर जवळगेकरांनी चांगलं मताधिक्य कल्याणशेट्टी यांना दिले, त्याची परतफेड म्हणून आमदार कल्याणशेट्टी यांनी विविध योजनेतून सुमारे 50 लाख रुपयांच्या विकास कामाची निधीची तरतूद सुलेर जवळगेच्या विकास कामासाठी केली. गावच्या विकासासाठी तुम्ही पाठपुरावा सोडू नका, मी तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही असे अभिवचन आमदार कल्याणशेट्टी यांनी दिले.
सरपंच अंबादास देवकते, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ पाटील, चेअरमन रविकांत बगले या त्रिकोणी संगमाने हा क्षण घडवून आणला.
याप्रसंगी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, गुरुलिंगय्या महास्वामी, युवा नेते सुमित पाटील, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे, सरपंच दिपाली अंबादास देवकते, चेअरमन रविकांत बगले, उपसरपंच धर्मनाथ घोडके, देविदास कोळेकर, नागनाथ पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक, देवस्थान पंचकमिटीचे प्रमुख सदस्य यांची उपस्थिती होती.




















