सोलापूर : ठाकरे गटाचे युवासेना उपजिल्हाप्रमुख काशी विभूते हे पक्षाच्या कारभाराला कंटाळून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली. ती बातमी छापून आली, त्यानंतर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांनी या बातमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ते म्हणाले, पक्षाने ज्यावेळी एखादा जिल्हाप्रमुख बदलला त्यावेळी त्याची संपूर्ण जिल्हा पदाधिकारी बॉडी बरखास्त होते, आम्ही यापूर्वीच गद्दारांची हकालपट्टी करून निष्ठावंतांना व नव्या युवकांना संधी दिली आहे. त्यामुळे काशी विभूते यांच्याकडे कोणतेही उपजिल्हाप्रमुख पद नव्हते.
आता सध्या अक्कलकोट उपजिल्हाप्रमुख म्हणून शरण सुरवसे हे युवासेनेचे काम करत आहेत. त्यांचा आमच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही असे स्पष्टीकरण चौगुले यांनी दिले आहे.



















