Thursday, February 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर ‘शहर मध्य’ मध्ये आता या भाईंची एन्ट्री ; राष्ट्रवादीचे जुबेर बागवान निवडणूक लढवण्यावर ठाम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 October 2024
in political
0
सोलापूर ‘शहर मध्य’ मध्ये आता या भाईंची एन्ट्री ; राष्ट्रवादीचे जुबेर बागवान निवडणूक लढवण्यावर ठाम
0
SHARES
590
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ‘शहर मध्य’ मध्ये आता या भाईंची एन्ट्री ; राष्ट्रवादीचे जुबेर बागवान निवडणूक लढवण्यावर ठाम

सोलापूर : सर्वाधिक मुस्लिम समाजाची मतदार संख्या असलेल्या शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम नेत्यांमधून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. एम आय एम कडून फारूक शाब्दी यांची उमेदवारी यापूर्वी जाहीर झाली आहे परंतु काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी उमेदवारी देण्यासाठी जोर लावला आहे.

एकीकडे असे असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती असून उमेदवारी देण्यासाठी बागवान समर्थक शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन मागणी केली या शिष्टमंडळात अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अमीर शेख,  वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे, अल्पसंख्यांक दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष मुहिज मुल्ला, सोलापूर शहर युवक उपाध्यक्ष सरफराज बागवान, वाहतूक आघाडी प्रसिद्ध प्रमुख इमरान रंगरेज, रहमान आळंदकर, शुभम खानज, रुपेश सुंडार उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांनी येणाऱ्या एक दोन दिवसात शहर मध्य मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेऊ कामाला लागा असे सांगितले असल्याचे समजले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता मात्र काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली होती. जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष पद अनेक वर्ष सांभाळले, सध्या ते शहर कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत. शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या जोडीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची शहरात चांगली बांधणी केली आहे. अजित पवारांचे सोलापुरातील विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.

सोलापुरात अजित पवारांच्या माध्यमातून सोलापूर शहरात सुमारे 20 कोटींचा निधी आणून विकास कामे केली आहेत. कोरोना काळात त्यांनी मार्केट यार्डातील हमाल कामगारासाठी राज्य शासनाकडून सहा हजार रुपये मदत म्हणून मिळवून दिले. कोरोनाचा कठीण काळात अनेक गोरगरिबांना हातभार लावले.

अजित पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणारा नेता, अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग, केवळ मुस्लिमच नाही तर सर्वच समाजाला सोबत घेणारे व्यक्तिमत्व या ओळखीच्या जोरावर जुबेर बागवान यांनी सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात दादांकडे उमेदवारी मागितली आहे उमेदवारी मिळाल्यास निश्चितच या मतदारसंघात परिवर्तन घडवू असा विश्वास बागवान यांनी व्यक्त केलाय.

Tags: Juber bagwanMuslim communityNCP Ajit PawarNCP Sharad PawarShahar Madhya
SendShareTweetSend
Previous Post

50 हजाराची लाच घेताना कृषी विभागाचा तंत्र अधिकारी अटकेत ; गाडीत सापडले सहा लाख रुपये

Next Post

Breaking : विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांना भाजपची उमेदवारी जाहीर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
Breaking : विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांना भाजपची उमेदवारी जाहीर

Breaking : विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांना भाजपची उमेदवारी जाहीर

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970766
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group