बार्शी : ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त मडलअधिकारी कवी व गझलाकार शब्बीर मुलाणी (वय 65) यांचे राजी 12.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, एक मुलगी, सुन, जावाई व नातवंडे असा परिवार आहे.
मुलाणी कवी कालिदास मंडळाचे माजी अध्यक्ष तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी सह कार्यवाह होते. बार्शी ग्रामदैवत श्री भगवंत यांच्यावर त्यांनी केलेली काव्यरचना अप्रतिम आहे. त्याचे काव्यसंग्रह व गझलावर ही अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.




















