Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सिध्देश्वर मंदिरासमोरील अतिक्रमण दोन दिवसात न हटविल्यास बांगड्यांचा आहेर ; या संघटनेचा महापालिकेला इशारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 December 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  :- सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिध्देश्वर मंदिरासमोरील दोन्ही रस्त्यांना गटारीच्या घाण पाण्याचा आणि अतिक्रमणाचा विळखा पडला असून दोन दिवसात अतिक्रमण काढण्यात यावे आणि पादचारी मार्गासह वाहतुकीला रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा पालिकेच्या प्रवेशद्वारात निद्रा आंदोलन करून प्रशासनाला बांगड्यांचा आहेर देऊ.असा इषारा सकल लिंगायत महासमितीचे राज्य समन्वयक डाॅ.बसवराज बगले यांच्यासह लिंगायत संघटनांच्या प्रमुखांनी दिला आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शीतल उगले आणि पोलीस आयुक्तांना महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक डाॅ.बसवराज बगले,शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे यांनी हे निवेदन सादर केले.

ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरासमोर गेल्या दोन महिन्यांपासून गटारीचे पाणी,घाणीचे साम्राज्य,लाकडी व लोखंडी फर्निचरांचे अतिक्रमण यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. पादचारी मार्ग हरवले असून मुख्य रस्ता गायब झाला आहे.चेंबर तुंबले असून रस्त्यावरील ड्रेनेजचे पाणी वाहात आहे.बेकायदेशीर अतिक्रमणामुळे या परिसरात एकेरी वाहतूक होत आहे. मंदिरासमोरचे अतिक्रमण हटवून परिसर स्वच्छतेसाठी सिध्देश्वर भक्तांनी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला दोन दिवसांचा वेळ दिला आहे.          

ग्रामदैवत सिध्देश्वर दर्शनासाठी शहरातील आणि परगावचे हजारो भाविक रोज येत असतात.आत्ता गड्डा यात्रेची तयारी सुरू झाली आहे.मंदिर परिसर भक्तांनी गजबजणार आहे.या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून या गंभीर विषयांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

सिध्देश्वर मंदिरात पायी चालत येणारे गावातील भक्त लक्ष्मी मंडई जवळील पूर्वेच्या गेट मधून ये – जा करू शकत नाहीत.लोखंडी सामान,बेकायदा उभारलेली खोकी आणि गेटसमोर थांबणाऱ्या मालवाहतूक वाहनांचा अडथळा होत आहे. पूर्णपणे पालिकेच्या रस्त्यावर बस्तान मांडलेल्या अवैध धंद्याकडे प्रशासनाचे का दूर्लक्ष आहे.असा सवालही डाॅ.बगले यांनी केला आहे.पूर्वेकडील मंदिराचे प्रवेशद्वार तात्काळ मोकळा झाला पाहिजे. अशीही मागणी अनेक नागरिकांकडून होत आहे.

या शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पार्क चौकाकडे जाणारा तसेच लक्ष्मी मंडई मार्गे गावात जाणारा वाहतुकीचा हा एकमेव रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात आहे.होम मैदानाकडील मंदिरासमोरच्या रस्यावर गेली अनेक महिने ड्रेनेजचे घाण पाणी रात्रंदिवस वाहत असून दुर्गंधी पसरली आहे.तरीही त्या रस्त्यावर  खोकेधारक लाकडी फर्निचर मांडून अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे.शिवाय डांबरी रस्ता खराब झाला आहे.

हे अतिक्रमण निद्रिस्त प्रशासनाला दिसत नसेल तर सिध्देश्वर भक्तांना हातात कायदा घ्यावा लागेल असा इशाराही  लिंगायत संघटनांनी दिला आहे.येत्या दोन दिवसांत मंदिरासमोरचा दक्षिणेकडचा रस्ता आणि पूर्वेकडील प्रवेशद्वार अतिक्रमण मुक्त न झाल्यास गुरूवार पासून महानगरपालिके समोरील प्रवेशद्वारात निद्रा आंदोलन करून प्रशासनाला बांगड्यांचा आहेर देण्यात येईल.असाही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

माजी आमदार दिलीप माने यांची अशीही मागणी ; तर बोरामणी विमानतळाचा विषय एका झटक्यात सुटेल

Next Post

सोलापुरात सुरेश हसापुरेंचा ‘श्रीदीप’ विजयी ; निंबर्गीच्या सरपंचपदावर होणार विराजमान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात सुरेश हसापुरेंचा 'श्रीदीप' विजयी ; निंबर्गीच्या सरपंचपदावर होणार विराजमान

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986396
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group