नागपूर : राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 9 पोलीस पाटील संघटना एकत्र आल्या असून महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कृती समितीच्या नेतृत्वाखाली नागपूर हिवाळी अधिवेशनावर बुधवारी भव्य असा मोर्चा काढण्यात आला.
पोलीस पाटील यांना दरमहा १५००० हजार रुपये मानधन मिळावे, पोलीस पाटील यांचे नुतनीकरण बंद करावे, पोलीस पाटील यांचा प्रवास भत्ता दुप्पट करण्यात यावा, पोलीस पाटील सेवानिवृत्तीनंतर एकरकमी २० लाख रुपये मिळावेत, पोलीस पाटील यांची वयोमर्यादा ६० वर्षे वरून ६५ वर्षे करावे यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. हजारों पोलीस पाटलांचा या मोर्चात सहभाग असून या गर्दीने नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.



















