“तुम चंद्राम गुरुजी के पोते हो क्या” ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा तो क्षण सचिन चव्हाण यांच्यासाठी अविस्मरणीय
सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काशी समजले जाणाऱ्या पोहरादेवी येथे नंगारा भवन याचे उद्घाटन केले. या नंगारा भवन मध्ये देशभरातील बंजारा समाजाचे संस्कृतीचे जतन करण्यात आले आहे. बंजारा समाजाची संस्कृती जोपासावी यासाठी बंजारा समाजाची रुढी परंपरा याचे विविध स्वरूपाचे पुतळे सुद्धा उभारण्यात आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ दिवंगत नेते बंजारा समाजाचे समाजसेवक चंद्राम चव्हाण गुरुजी यांचा सुद्धा पुतळा या नंगारा भवन मध्ये उभारण्यात आला आहे. त्यांच्या जीवनपटावर माहिती सुद्धा देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बंजारा समाज बांधवांसाठी ही गोष्ट अभिमानाची आहे.
याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सचिन चव्हाण यांची भेट झाली. तुम चंद्रराम गुरुजी के पोते हो क्या असे पंतप्रधानांनी विचारले. हा सचिन यांच्या जीवनातील अविस्मरणीय सण होता. येणाऱ्या काळात समाज बांधवांसाठी गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवून चव्हाण यांनी समाज हितासाठी जे योग्य निर्णय आहे ते घेण्याचे ठरविले आहे. मोदी यांच्याशी परिचय करून देण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच चंद्राम चव्हाण गुरुजी यांची ही माहिती दिली.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढवण्यास इच्छुक झाल्याने सचिन चव्हाण हे मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय झाले आहेत.