Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

धर्मराज काडादी दक्षिणमधून निवडणूक लढवणार? सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत आग्रह ; पुढे काय झाले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 September 2024
in political
0
धर्मराज काडादी दक्षिणमधून निवडणूक लढवणार? सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत आग्रह ; पुढे काय झाले
0
SHARES
345
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धर्मराज काडादी दक्षिणमधून निवडणूक लढवणार? सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत आग्रह, पुढे काय झाले

सोलापूर : सोलापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणाऱ्यांना सुद्धा हा मोठा धक्का असून त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून तयारी केलेले अमर पाटील यांनाही हा धक्का आहे. तो धक्का म्हणजे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

आज सोमवारी काडादी यांच्या गंगा निवासस्थान या ठिकाणी सिद्धेश्वर परिवारातील मान्यवरांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीत धर्मराज काडादी यांनी दक्षिण विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला असून त्यामध्ये सिद्धेश्वर परिवार यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीनंतर संपूर्ण सिद्धेश्वर परिवार काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या जाई जुई फार्म हाऊस येथील गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले असून त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यासोबत याप्रकरणी चर्चा होणार असल्याचेही समजले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण, उत्तर, अक्कलकोट या तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना समजला जाणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली. ही चिमणी भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर पाडली गेली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर शेतकऱ्यांचा प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तोच रोष लोकसभा निवडणुकीत ही दिसून आला आणि त्यामुळे धर्मराज काडादी यांच्याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आपुलकी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या काँग्रेस पक्षाकडून सुमारे 18 ते 20 जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि काँग्रेस पक्षातील प्रत्येक गटाकडून एकमेकाला विरोध होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे धर्मराज काडादी हे जर उमेदवार म्हणून पुढे आले तर 75 ते 90 टक्के विरोध कमी होईल अशी चर्चा दक्षिण मध्ये ऐकण्यास मिळते. त्यामुळे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी सुद्धा धर्मराज काडादी यांची उमेदवारी निश्चितच धोकादायक असणार यात कोणतीही शंका नाही.

Tags: #Dharmaraj kadadiBJPCongressDakshin solapur
SendShareTweetSend
Previous Post

देवदर्शनासाठी गेलेली महिला डॉक्टर बेपत्ता ; नवऱ्याला म्हणाली…..

Next Post

धर्मराज काडादी दक्षिणमधून निवडणूक लढविणार ; सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत शिक्कामोर्तब

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
धर्मराज काडादी दक्षिणमधून निवडणूक लढवणार? सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत आग्रह ; पुढे काय झाले

धर्मराज काडादी दक्षिणमधून निवडणूक लढविणार ; सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002564
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group