इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना ; भव्य मिरवणुकीत भगवान शंकरांचा महाकाल रूप सजावटीने लक्ष वेधले लक्ष
सोलापूर -शनिवारी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या मांगल्य मूर्ती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना थाटामाटात करण्यात आले. उंच गणेश मूर्ती आणि भव्य दिव्य भगवान शंकराची महाकाल रूपाचे सजावट हे या मंडळाचे मुख्य आकर्षणाचा केंद्र होते. ढोल ताशाच्या निनादात, पारंपारिक वाद्यासह मंगलमूर्ती मोरया चा जयघोष पारंपारिक पेहरावातील हजारो गणेश भक्त आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अशा उत्साही वातावरणात वाजत गाजत गणरायाच स्वागत करण्यात आलं.
प्रारभी मोदी रेल्वे ब्रिज येथे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या हस्ते श्रींची धार्मिक मंत्रोपचारात पूजा आणि आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उत्सव अध्यक्ष श्रीनिवास गायकवाड, खजिनदार कार्तिक जाधव, कार्याध्यक्ष आतिश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, प्रथमेश गायकवाड, अजिंक्य जाधव, तेजस गायकवाड, तुषार गायकवाड, सोनू पटेल, ऋषी येवले, आकाश जाधव, राजन गायकवाड, नागराज गायकवाड आदींसह इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाचे गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंडळाकडून भव्य दिव्य अशी महाकाल भगवान श्री शंकरांची आरास हे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. ही मिरवणूक मोदी रेल्वे ब्रिज येथून प्रारंभ होऊन रामवाडी, पटवर्धन चाळ, गायकवाड क्लासेस, आदिशक्ती माता चौक, मरगु मास्तर मैदान, ऐक्य चौक या मार्गावरून काढण्यात आली तर इच्छा भगवंताची चौक येथे या मिरवणुकीचे समारोप झाले. तदनंतर भल्या मोठ्या मंडपात मंगलमय वातावरणात विराजमान झाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापनाची श्रींची महाआरती संपन्न झाली.
दरम्यान मिरवणुकीमध्ये इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचे भल्या मोठ्या एलईडी स्क्रीन द्वारे सादरीकरण करण्यात आले. तसेच इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची विविध प्रतीकृतीतील मनमोहक रोप पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती आजपासून पुढील दहा दिवस भक्त गण रंगात न्हाऊन निघणार आहेत. यावेळी सेटलमेंट परिसरातील मानाच्या इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची विधिवत मुहूर्तावर अत्यंत शिस्तबद्ध अशा मिरवणुकीने श्रींची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाली.