सोलापुरातील हा युवा नेता बनतोय अजित पवारांच्या गळ्यातील ताईत
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये तब्बल 3000 रुपये जमा झाले. त्याचबरोबर नुकत्याच मांडण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज बिल माफी केली.
त्या प्रित्यर्थ सोलापुरातील मुस्लिम समाजातील कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते इरफान शेख यांनी अजित पवार यांची यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन दादांचा सत्कार केला. यावेळी बब्बू पैलवान उपस्थित होते.
यासह प्रभाग क्रमांक 21 ब मध्ये अमन हॉटेल ते मदिना चौक पर्यंत 1 कोटी 27 लाख रुपये पाण्याची लाईन निधी मंजूर केल्याबद्दल दादांचे आभार व्यक्त करण्यात आले.
इरफान शेख हे सध्या अजित पवार यांच्या गळ्यातील ताईत बनत आहेत का? असे चित्र आता दिसून येत आहे.