सोलापुरात हजारो शिक्षकांचा एल्गार ! सुभाष माने यांच्या नेतृत्वात विराट मोर्चाने वेधले लक्ष, या आहेत मागण्या
सोलापूर : शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध शैक्षणिक मागण्या मान्य होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 27 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी काढलेल्या हजारोंच्या शिक्षक मोर्चाने अख्ख्या सोलापूरचे लक्ष वेधून घेतले. सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष प्रा. सुभाष माने यांच्या नेतृत्वात हा विराट मोर्चा यशस्वी झाला.
दि.१५ मार्च २०२४ च्या सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी. शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर असावे, दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने जाहीर करावा, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने द्यावे तसेच शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान जाहीर करावे, पवित्र पोर्टल वरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी यासह तब्बल 15 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
चार हुतात्मा पुतळ्या पासून निघालेला मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, सिध्देश्वर मंदिर समोरून, सिध्देश्वर प्रशालेमार्गे जिल्हा परिषदेच्या पुनम गेटवर आला याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सोलापूरचे अध्यक्ष प्रा. सुभाष माने आणि समन्वयक तानाजी माने यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
मोर्चात सहभागी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना
१. सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर
२. सोलापूर जिल्हा संस्थाचालक संघटना
३. सोलापूर जिल्हा विनाअनुदान शाळा कृती समिती
४. सोलापूर जिल्हा शिक्षक परिषद
५. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ (टी डी एफ संघटना)
६. सोलापूर जिल्हा बहुजन शिक्षक संघटना
७. सोलापूर जिल्हा प्रहार शिक्षक संघटना
८. सोलापूर जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी सेना
९. सोलापूर शहर जिल्हा क्रिडा व शारिरिक शिक्षण शिक्षक संघटना महासंघ
१०. जुनी पेन्शन हक्क संघटना
११. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
१२. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
१३. सोलापूर जिल्हा काँग्रेस शिक्षक सेल
१४. सोलापूर जिल्हा आश्रम शाळा संघटना
१५. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ शाखा सोलापूर
१६. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना
१७. अल्पभाषिक व अल्पसंख्याक संस्था चालक संघटना
१८. अखिल भारतीय ऊर्दू शिक्षक संघटना, जन सेवा शिक्षक संघटना
१९. महाठोका शिक्षक संघटना
२०. सोलापूर जिल्हा ऊर्दू माध्यमिक मुख्याध्यापक संघ
२१. राष्ट्रवादी शिक्षक संघटना
२२. शिक्षक भारती
२३. स्वाभीमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ
२४. महाराष्ट्र राज्य नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना
२५. क्रिडा शिक्षक महासंघ
२६. स्वाभीमानी शिक्षक संघटना
२७. महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक महासंघ
२८. प्राथमिक मुख्याध्यापक संघटना
२९. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना
३०. युवक शिक्षक कर्मचारी संघ
३१. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
३२. मराठी विषय शिक्षक संघटना
३३. हिंदी अध्यापक संघ
३४. गणित अध्यापक मंडळ
३५. इंग्लिश टिचर असोसिएशन
३६. विज्ञान शिक्षक मंच
३७. समाजशास्त्र विषय शिक्षक संघटना