जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने काळ्या फिती लावून का केले कामकाज ; तर बेमुदत संपाची हाक
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जुनी पेन्शन, वेतन त्रुटी व राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलबित मागणीकडे शासनाचे विशेषता ग्रामविकास विभागाचे हेतूता दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने आंदोलनाची सुरुवात म्हणून संपूर्ण राज्यभर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर कर्मचारी काळया फीती लावून कामकाज करीत आहे.
सर्वात महत्त्वाची मागणी जुनी पेन्शन योजना याकडे तीन महिन्यापूर्वी शासनाने आश्वासन देऊनही अद्याप या योजनेला मूर्त स्वरूप दिलेला नाही त्याचबरोबर वेतन त्रुटी अत्यंत जिव्हाळ्याचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याचबरोबर लिपिकांची पदोन्नत स्तर कमी करणे, सुधारित कर्मचारी आकृतीबंध, पदोन्नतीने रिक्त पदे भरणे, परिचर, वाहन चालक सेवा भरती नियमात दुरुस्ती करणे, अनुकंपामध्ये टक्केवारी वाढवणे, महाराष्ट्र विकास सेवा श्रेणी नियमात दुरुस्ती करावी, परिचर वाहन चालक यांच्या गणवेश धूलाई भता वाढवून द्यावा अशा साधारण 30 प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर काळया फिती लावून जिल्हा परिषद कर्मचारी कामकाज करीत आहेत.
या उपरही शासनाने याबाबतीत याची दखल घेतली नाही तर नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी दुपारी दीड ते दोन या कालावधीमध्ये निदर्शने कार्यक्रम राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती समोर आयोजित केले आहे. त्यानंतर ही शासनाने दखल न घेतल्यास याबाबत बेमुदत संपाची हाक दिली जाणार आहे.
या आजच्या या आंदोलनात राज्य सरचिटणीस जिल्हा परिषद कर्मचारी युनियन विवेक लिंगराज, डॉ.एस पी. माने, विभागीय संघटक, जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवली, कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरी, सचिव विलास मसलकर, श्रीशैल देशमुख, महिला कार्याध्यक्ष स्वाती स्वामी, राजश्री कांगरे, मनीषा वास्ते, महानंदा कुंभार, वर्षा अवधूर्ती, प्रतीक्षा कांबळे, अरुणा रांजणे, शामल काळे, निर्मला राठोड, संतोष शिंदे, उमेश खंडागळे, विशाल घोगरे, राकेश सोडी, सविता काळे, रोहित घुले, अंबिका वाघमोडे, महेश पतंगी, महेश केंद्रे, रहीम मुल्ला, नवनाथ वास्ते, नागेश कोमारी, डॉ. उमाकांत ढेकळे, आरती माडेकर, नितीन शिंदे, रफिक शेख, प्रमोद मोरे, प्रभाकर डोईजोडे, विशाल उंब्रे, ज्योती लामकाने, सविता मिसाळ, हरीश म्हेत्रास, योगेश हबू, पीसी कवीटकर, शिवानंद ममाने, प्रफुल्ल रणदिवे, अजिज सय्यद, वसंत काळे, विजय आदलिंगे, दत्तात्रय घोडके, ज्ञानेश्वर समदूर्ले, मल्लिकार्जुन कोष्टी, नरेंद्र आकेले, शिवाजी राठोड, कृष्णा लोंढे, आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या आंदोलनात जिल्हा परिषदेतील व पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचारी यांनी आंदोलनात अग्रभागाने सहभाग नोंदवला. आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना याविषयी निवेदन देण्यात आले.