हातात तुपातील बेसन लाडू ; हजारो भाविक झाले तृप्त ; वैद्य व राठोड जोडीने वेधले गुरुपौर्णिमा दिनी लक्ष

स्वयं शिक्षा फाउंडेशनचे सोमनाथ वैद्य व सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड यांच्या संयुक्त विद्यमानाने दक्षिण तालुक्यामधील विविध मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसाद म्हणून 51000 लाडूचे वाटप करण्यात आले आहे. रविवारी संपूर्ण देशभरात गुरुपौर्णिमेचा सण साजरा होत असताना दुसरीकडे मंदिरांमध्ये दर्शनाला आलेल्या भाविकांच्या हातात शुद्ध तुपातील बेसनाचे लाडू पडले आणि अनेक भाविक तृप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.
जुळे सोलापूर मधील समर्थ नगर इथल्या स्वामी समर्थ मंदिर, कल्याण नगर दत्त मंदिर, सुंदरम नगर स्वामी समर्थ मंदिर, सोरेगाव गजानन महाराज मंदिर, बनशंकरी चौक माढा बनशंकरी मंदिर, सिंधू विहार गणेश मंदिर, कमला नगर येथील हनुमान मंदिर, अलकुंटे बिल्डर यांचे श्री स्वामी समर्थ मंदिर, बिरनाळ मठ, मंद्रूप, हत्तुर, सदर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
दक्षिण तालुक्याचे नेते शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख अण्णाप्पा सत्तूबर, लिंगायत समाजाचे नेते श्रीशेल हत्तुरे, तेलगावचे माजी सरपंच पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक मंदिरा बाहेर भाविकांना प्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात आले. हा उपक्रम आजच्या गुरुपौर्णिमा दिनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.



















