सोलापूरचे काँग्रेस कार्यकर्ते टाकणार श्रेष्ठींवर दबाव ; शहर उत्तर आपलाच, या नेत्याने घेतला पुढाकार
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर सोलापुरात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ॲक्टिव झाले आहेत. सोलापूर शहरातील तीन ही विधानसभा मतदारसंघावर कार्यकर्ते आता दावा सांगत आहेत.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विशेष डोळा हा शहर उत्तर मतदारसंघावर आहे. मागील निवडणुका मध्ये हा मतदारसंघ आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला होता.पण यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उत्तर साठी आक्रमक झाले आहेत.
दरम्यान गुरुवारी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी सभापती सुनील रसाळे, सुदीप चाकोते, अशोक कलशेट्टी, हेमा चिंचोळकर, संजय शिंदे, दत्तू बंदपट्टे, एन के क्षिरसागर, चक्रपाणी गज्जम, पुरुषोत्तम श्रीगादी, वीणा देवकlते, भारती इप्पलपल्ली, नुरअहमद नालवार यांची उपस्थिती होती.
विश्वनाथ चाकोते यांनी मी उमेदवारी साठी इच्छुक नाही पण पक्षाने दिलेल्या उमेदवाराला आमदार करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीत रसाळे यांनी शहर उत्तर हा काँग्रेसचा आहे, दोन वेळा त्यांच्या उमेदवाराचे डीपॉझिट जप्त झाले, मग हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला पाहिजे अशी मागणी केली. या बैठकीत उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी उत्तर हा काँग्रेसला मिळावा यासाठी पक्ष श्रेष्ठीवर दबाव टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शहर उत्तर मधून सुदीप चाकोते, सुनील रसाळे, राजन कामत, सुशील बंदपट्टे यांची सध्या तरी नावे चर्चेत आहेत. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी मात्र आपण इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. भाजप मधून काँग्रेस मध्ये आलेले अशोक निंबर्गी यांची भूमिका समजू शकली नाही, ते सुद्धा चांगले उमेदवार होऊ शकतात. आंबेडकरी समाजातील संध्या काळे या सुद्धा इच्छुक असल्याचे समजते. सातलिंग शटगार यांनीही मागणी केली आहे. माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले हे इच्छुक आहेत की नाही हे अजून उघड झाले नाही.