प्रणिती शिंदे रमल्या वारकऱ्यात ; महीला खासदाराची पंढरपुरात दिसली क्रेझ ; पहा फोटो व व्हिडिओ
पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने आषाढी वारी निमित्त येणाऱ्या सर्व पालख्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पालखी प्रमुखांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
पंढरपूरच्या वेशीवर असलेले इसबावी येथे आषाढी वारी सोहळ्याचं सगळ्यात शेवटचं रिंगण सोहळ्यात खासदार प्रणिती शिंदे सहभागी होऊन दिंडीतील वारकर्यांच्या सोबत ठेका धरत टाळ-मृदंगांच्या गजरात फुगड्या अन् हरिनामाचा गजर केला. रिंगण सोहळ्यानंतर विसावा मंदिर येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री. एकनाथ महाराज, श्री. नामदेव महाराज, संत मुक्ताबाई व अन्य सर्व पालख्या एकत्रितपणे पंढरपूरकडे विठू माऊलीच्या दर्शनासाठी प्रस्थान केले.