सोलापुरात बहुजन समाज पार्टीचे निषेध आंदोलन ; ही केली मागणी
बहुजन समाज पार्टी तमिळनाडू राज्याचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉंग यांच्या हत्येच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या प्रकरणात संशयास्पद पकडले गेलेले आठ आरोपींची कसून चौकशी करावी व मूळ आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.
प्रसंगी उपस्थित जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत काळे, माढा विधानसभा प्रभारी श्रीकृष्ण प्रक्षाळे, माजी शहर अध्यक्ष देवा उघडे, अमर साळवे, सुहास सुरवसे, प्रमोद राऊत, महिंद्र कांबळे अदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.