हा चार्ज मला नको रे बाबा ! अपेक्षेप्रमाणे अमोल जाधव यांच्याकडे झेडपी समाज कल्याणचा चार्ज
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतो. तत्कालीन समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे पदभार देण्यात आला होता परंतु महिन्यातच त्यांनी स्वतःहून पदभार सोडला तो पदभार जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे दिला गेला.
आता महिना दीड महिन्यातच तो चार्ज बदलण्यात आला आहे. हा पदभार पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे बदली प्रक्रियाचे कामकाज असल्याने त्यांना समाज कल्याण विभागाकडे व्यवस्थित लक्ष देता येत नव्हते. त्याचबरोबर विधानसभेपूर्वी निधी खर्च पडण्यासाठी कामाचा निपटारा लवकरात लवकर करण्याची गरज आहे आणि त्यात पूर्णवेळ अधिकारी आवश्यक असून पाणी व स्वच्छता विभागातील कामकाज पाहता समाज कल्याणचा पदभार अमोल जाधव यांच्याकडे देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतला आहे.