Tuesday, June 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुरत चेन्नई एक्सप्रेसच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना 15 जूनपर्यंत…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2024
in maharashtra
0
सुरत चेन्नई एक्सप्रेसच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना 15 जूनपर्यंत…..
0
SHARES
2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुरत चेन्नई एक्सप्रेसच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना 15 जूनपर्यंत…..

सोलापूर, दिनांक 29(जिमाका):- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विकास कामे जिल्ह्याच्या विविध भागात सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, सुरत चेन्नई महामार्ग, कृष्णा मराठवाडा प्रकल्प, पालखी महामार्ग, नगर करमाळा टेंभुर्णी मार्ग, सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग,सोलापूर साठी प्रस्तावित असलेली समांतर पाईप लाईन,
करमाळा टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर शहरातील उड्डाणपुलाची कामे या पायाभूत प्रकल्पांचा समावेश होतो. हे सर्व प्रकल्पाचे कामे विहित काल मर्यादित पूर्ण होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या कामात असलेल्या भूसंपादन विषयक अडचणी 15 जून पर्यंत सोडविण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

नियोजन समिती सभागृहात आयोजित पायाभूत प्रकल्पातील भूसंपादन विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी विशेष भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन अधिकारी क्रमांक एक सुमित शिंदे, भूसंपादन अधिकारी क्रमांक 7 प्रमोद गायकवाड, भूसंपादन अधिकारी 11 श्रावण क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी विठ्ठल उदमले, सदाशिव पडदुने, विजया पांगारकर, प्रियंका आंबेकर, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम, केशव घोडके, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह रेल्वे, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर भूसंपादन विषयक ज्या अडचणी येत आहेत त्या संबंधित भूसंपादन अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी एकत्रित बसून त्यावर तात्काळ मार्ग काढावा. संबंधित शेतकरी अथवा अन्य लाभार्थी यांना विहित नियमावलीनुसार मिळणारा मोबदला तात्काळ द्यावा. महामार्गावर येणाऱ्या ज्या गावातील शेतकरी, नागरिक यांनी महामार्गाचे काम अडवले आहे, त्यांच्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा. जे लाभार्थी महामार्गात गेलेल्या जमिनीचा ताबा देणार नाहीत अशा ठिकाणी विहित नियमावलीचा वापर करून पोलीस बंदोबस्तात ताबा घेऊन त्या ठिकाणची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

सुरत चेन्नई महामार्गासाठी 678 प्रकरणात एकूण 534 कोटीचा निधी भूसंपादनासाठी मंजूर झालेला आहे. त्या अनुषंगाने आज पर्यंत 295 कोटीचे वाटप झालेले आहे. परंतु अक्कलकोट तालुक्यातील 17 गावांमधील शेतकरी ग्रामस्थ भूसंपादनासाठी अर्ज करत नाहीत. त्याचप्रमाणे अक्कलकोटसह बार्शी, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर अशा चार तालुक्यातील 178 प्रकरणे प्रलंबित आहेत. तरी सर्व संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी विशेष कॅम्प लावावेत. जमीन मोजणीचे कार्यवाही भूमी अभिलेख कार्यालयाने पूर्ण करावी त्यासाठी आवश्यक असलेले शुल्क कोणी भरावे याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

कृष्णा मराठवाडा प्रकल्पातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 604 हेक्टर क्षेत्र भूसंपादन करणे याची कारवाई पूर्ण झालेली असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ उत्तर सोलापूर व करमाळा तालुक्यातील 122 हेक्टर क्षेत्र भूसंपादनाबाबत कार्यवाही संबंधित विभागाने त्वरित पूर्ण करावी. तसेच यातील 28 हेक्टर क्षेत्र भूसंपादनाच्या अनुषंगाने खाजगी वाटाघाटी करून कार्यवाही पूर्ण करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वादाने दिल्या. त्याचप्रमाणे पालखी महामार्गावरील भूसंपादनाच्या बाबतीत सर्व अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपविभागीय अधिकारी संबंधित पोलीस निरीक्षक यांनी संयुक्त बैठक घेऊन कार्यवाही करावी. नगर करमाळा टेंभुर्णी महामार्गाचे सोलापूर जिल्ह्यातील 60 किलोमीटरच्या रस्त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी संयुक्त मोजणी मोहीम राबवावी, असे त्यांनी सूचित केले.

सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. तसेच सोलापूर शहरातील दोन उड्डाणपलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सोलापूर महापालिकेच्या वतीने राबवली जात आहे. त्या अनुषंगाने ज्या अडचणी केंद्र शसनाच्या रेल्वे, डाक विभाग तसेच राज्य शासनाच्या पोलीस विभागाकडून भूसंपादनाच्या अडचणी येत आहेत त्या संबंधित विभागाशी समन्वय साधून त्वरित पूर्ण कराव्यात. या अनुषंगाने लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल, असे त्यांनी सुचित केले.

यावेळी सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांकडून त्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती बैठकीत सादर केली. या विकास प्रकल्पातील भूसंपादन विषयक अडचणीच्या अनुषंगाने भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख सर्व संबंधित यंत्रणाची समन्वय ठेवणार आहेत.
*******

Tags: Collector kumar ashirwadSurat Chennai green field express
SendShareTweetSend
Previous Post

बापरे ! एवढी मोठी मगर ;  दक्षिण तालुक्यात मगर दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट

Next Post

ब्रेकींग ! मतमोजणी केंद्रात फक्त यांनाच मोबाईल परवानगी ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982055
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group