Sunday, August 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात घडतंय ‘नवले ‘च ; MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही ‘IEC’ चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडेच

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 May 2024
in solapur
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात घडतंय ‘नवले ‘च ; MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही ‘IEC’ चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडेच
0
SHARES
194
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात घडतंय ‘नवले’ च ; MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही ‘IEC’ चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडेच

सोलापूर : जि. प. आरोग्य विभागात जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पदावर MPSC मार्फत धनंजय वाळा या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. दिड महिन्यापूर्वी ते रूजूही झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे IEC चे कामकाज देणे बंधनकारक आहे. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांचा सोयीस्कर कारभार म्हणजे MPSC मार्फत हजर झालेल्या अधिकाऱ्याऐवजी कंत्राटी कर्मचाऱ्याकडे IEC चे कामकाज देण्यात आले आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या-त्या पदाचे कामकाज त्याच अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकार आहे. मात्र याला जि. प. आरोग्य विभाग अपवाद आहे. येथे चक्क MPSC मार्फत हजर झालेल्या अधिकाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कामकाज पाहणे पसंत केले जात आहे. यावर नवनियुक्त जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय वाळा यांनीही सदरचा प्रकार IEC ब्युरो पुणे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांना कळवला नाही.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडून नेहमीच वरिष्ठांच्या आदेशाला, नियम-अटींना केराची टोपली आणि स्वतःसाठी सोयीस्कर कामकाज करण्याची कार्यपध्दती राहिली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे “अर्थ” नसताना सोयीस्कररित्या कंत्राटी आर. के. एस. को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांच्याकडे IEC चे कामकाज सोपविले आहे. यापूर्वीही त्यांच्याकडूनच औषध खरेदीच्या फाईलींचे कामकाज करून घेतले आहे. वास्तविक पाहता NHM आयुक्त धीरज कुमार यांच्या 3 मार्च 2023 च्या लेखी पत्रानुसार NHM मधील एखाद्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे इतर पदभार/कामकाज सोपवताना वरिष्ठांची/वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी आर. के. एस. को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांच्याकडे IEC खरेदी, वाटप आणि अन्य प्रक्रीयेच्या फायली हाताळण्याचे कामकाज वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय दिले आहे. त्यांच्याकडून NHM आयुक्त धीरज कुमार यांच्याकडूनच नाही तर NHM अध्यक्षा तथा सीईओ मनिषा आव्हाळे यांच्याकडूनही परवानगी घेतली जात नाही. दुसरीकडे कंत्राटी कर्मचारीही सीईओ मनिषा आव्हाळे यांना न घाबरता डॉ. संतोष नवले यांच्या मर्जीनुसार, नियमांना डावलून कामकाज करताना दिसून येत आहेत.

दुसरीकडे आर. के. एस. को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांनी त्यांच्या जॉबचार्ट नुसार “जन आरोग्य समिती”चे कामकाज पाहणे गरजेचे आहे. मात्र नामदे यांच्याकडूनही मुळ कामकाज बाजूला ठेऊन बेकायदेशीरपणे औषध खरेदीच्या फायली हाताळणे, IEC मधील खरेदी प्रक्रीया, वाटप आणि अन्य कामकाज गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. परिणामी जन आरोग्य समितीचे कामकाज जवळपास ठप्प आहे. निधी असूनही तो खर्च होत नसल्याचे चित्र आहे.

उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांच्या भूमीकडे लक्ष

IEC खरेदीतील मलिदा सर्वांना प्रिय आहे. या पदावर सोयीस्कर कामकाज सुरू आहे. यापूर्वीही बोगस जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी म्हणून मिरवणाऱ्या आरोग्य सेवकालाही आता परत या पदाचा हव्यास आहे. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी म्हणून मीच या पदावर बसणार, अशी स्वतःच स्वतःची सर्वत्र चर्चा या आरोग्य सेवकाने घडवून आणली. परंतु MPSC मार्फत जाहीर केलेल्या यादीत यांचे नाव कुठेच दिसले नाही. तर त्या ऐवजी धनंजय वाळा यांची नियुक्ती झाल्याचे दिसून आले. आता पुन्हा वाळा यांना हटवून मर्जीतील अधिकाऱ्याला बसवायचे आणि त्याआडून IEC चा कारभार स्वतःच हाकायचा, यासाठी त्या आरोग्य सेवकाची धडपड सुरू आहे. इतरत्र उघड उघड जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना उगीच Samsung Fold 5 दिला आहे का? त्यामुळे याचे कामकाज मलाच मिळणार, अशीही वाच्यता सर्वत्र होताना दिसत आहे. परंतु यावर IEC ब्युरो पुणे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर हे काय निर्णय घेणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Dho solapurDr Santosh nawaleZilha parishad solapur
SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी आशीर्वाद ‘ ग्रेट फुल जॉब ‘ ; माढयात ‘सिंग इज किंग’  ; जिल्हा माहिती कार्यालयाचं ‘शंभर टक्के सोनं ‘

Next Post

एमआयएमच्या फारुख शाब्दी यांनी लोकसभा प्रचाराची हौस भागवली हैद्राबाद व औरंगाबादेत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
एमआयएमच्या फारुख शाब्दी यांनी लोकसभा प्रचाराची हौस भागवली हैद्राबाद व औरंगाबादेत

एमआयएमच्या फारुख शाब्दी यांनी लोकसभा प्रचाराची हौस भागवली हैद्राबाद व औरंगाबादेत

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995619
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group