Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी आशीर्वाद ‘ ग्रेट फुल जॉब ‘ ; माढयात ‘सिंग इज किंग’  ; जिल्हा माहिती कार्यालयाचं ‘शंभर टक्के सोनं ‘

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 May 2024
in Administration
0
जिल्हाधिकारी आशीर्वाद ‘ ग्रेट फुल जॉब ‘ ; माढयात ‘सिंग इज किंग’  ; जिल्हा माहिती कार्यालयाचं ‘शंभर टक्के सोनं ‘
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हाधिकारी आशीर्वाद ‘ ग्रेट फुल जॉब ‘ ; माढयात ‘सिंग इज किंग’  ; जिल्हा माहिती कार्यालयाचं ‘शंभर टक्के सोनं ‘

सोलापूर : यंदाची सतरावी लोकसभा निवडणूक प्रशासकीय दृष्टीने बऱ्याच कारणाने लक्षात राहणारी असेल विशेष करून सोलापूरच्या प्रशासनाला. दर लोकसभा निवडणुकीला अधिकारी बदललेले असतात पण त्याचे काम आठवणीत राहते.

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय संवेदनशीलपणे हाताळली त्याबद्दल त्यांचे प्रशासनासह राजकीय वर्तुळातूनही कौतुक होत आहे. या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासनाने अनेक चांगल्या सुविधा केल्या होत्या. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप मार्फत जनजागृती करण्यात आली.

42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा, पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, मतदाराकरिता सावलीची व्यवस्था, उष्माघातापासून बचावासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार ओआरएसयुक्त पाण्याचा पुरवठा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा, स्वयंसेवकांची नियुक्ती, महिला व जेष्ठ मतदारासाठी स्वतंत्र रांग, मतदान केंद्राचा परिसर व स्वच्छतागृह साफसफाई, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रासाठी भिन्न रंगाचा वापर, मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्षाची स्थापना या सुविधा देण्यात आल्या होत्या. सोलापुरात दिलेल्या या सुविधांमुळे नागरिकांनी प्रशासनाचे विशेष कौतुक केले.

एकूणच राजकीय परिस्थिती, देशातील निवडणुकीचे वातावरण पाहता तसे पाहायला गेल्यास ही निवडणूक सोपी नव्हती परंतु कमी वयात एवढी मोठी जबाबदारी पार पाडणारे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पद्धतशीरपणे या निवडणुकीचे योग्य नियोजन केले. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर ते स्वतः लक्ष ठेवून होते. त्यांनी स्वतःचे मतदान ही दुपारी चारच्या पुढे केले. प्रत्येक बाबतीत ते positive दिसले आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कामकाजाची पद्धत पाहता अधिकारी ‘कलेक्टर सर ग्रेट फुल जॉब’ असा शब्द वापरत आहेत. त्यांच्या जोडीला निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, विठ्ठल उदमले, सदाशिव पडदूने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निर्हाळी यांची साथ महत्त्वाची ठरली.

प्रशासनाने मतदारांना दिलेल्या सुविधांचे कौतुक झाले मात्र मतदारांची नावे यादी मधून डीलेटेड झाल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी मागणी होत आहे.

माढा लोकसभा निवडणुक यावेळी अतिशय चुरशीची आणि लक्षवेधी ठरली. या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर होत्या. त्या सोलापुरात येऊन केवळ एका महिन्यातच त्यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जबाबदारी आली. मात्र यापूर्वी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेल्या कामाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. महिला अधिकारी आणि त्या सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी त्यामुळे इतर पुरुष अधिकाऱ्यांना मर्यादा पडतात. पण ठाकूर या अतिशय मनमिळावू आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असल्याने कोणत्याही अधिकाऱ्याला काम करताना अडचण जाणवली नसल्याचे ऐकण्यास मिळते. त्यांनीही या निवडणुकीचे अतिशय योग्य पद्धतीने नियोजन करत ही निवडणूक हाताळल्याचे दिसून येते. सांगोला आणि करमाळा मध्ये ईव्हीएम च्या बाबतीत झालेल्या दोन घटना वगळता ही निवडणूक अतिशय व्यवस्थित आणि शांततेत पार पडल्याचे पाहायला मिळाले.

लोकसभा -विधानसभा निवडणूक असली की, माध्यमांसाठी जिल्हा माहिती कार्यालयाची भूमिका महत्त्वाचे असते. यावेळी महाराष्ट्रात सर्वात प्रथम सोलापुरात मीडिया सेंटर कार्यान्वित करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या कामकाजाची पद्धत अतिशय व्यवस्थितपणे पाहायला मिळाली.  यंदाच्या निवडणुकीत प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यासोबत आता सोशल मीडिया सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. निवडणुकीचे प्रत्येक अपडेट तितक्याच जलदपणे आणि अतिशय वेळेवर माध्यमांना मिळाले. यापूर्वी एखाद्या उमेदवाराने अर्ज भरल्यास त्याचा फोटो सायंकाळी पाचच्या नंतर मिळायचा परंतु यावेळी अर्ज भरल्याच्या पाचव्या मिनिटाला तो फोटो माध्यमांना मिळून जायचा, मतदानाची आकडेवारी सुद्धा वेळेवर मिळण्यास मदत झाली त्यामुळे माहिती कार्यालयाने हायटेक काम केले असून या विभागाला शंभर टक्के सोनं लाभल्याची चर्चा होत आहे.

स्वीप मार्फत प्रकल्प अधिकारी सुधीर ठोंबरे आणि मतदान केंद्र  दुरुस्ती व सुविधा पुरवण्यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांचा रोल महत्वाचा ठरला आहे.

Tags: Collector kumar ashirwadLoksabha election 2024Monika Singh ThakurSolapur loksabha electionSunil sontakke
SendShareTweetSend
Previous Post

किरण माशाळकर यांना राज्यस्तरीय युवती आयकॉन पुरस्कार प्रदान

Next Post

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात घडतंय ‘नवले ‘च ; MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही ‘IEC’ चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडेच

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात घडतंय ‘नवले ‘च ; MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही ‘IEC’ चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडेच

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात घडतंय 'नवले 'च ; MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही 'IEC' चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडेच

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002453
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group