मुंबईतील दिव्यांग मॅाडेल विराली मोदी या रजिस्टर मॅरेज करण्यासाठी रजिस्ट्रेशन कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी विराली मोदी दिव्यांग असतानाही अरूण घोडेकर यांनी दुसर्या मजल्यावरून खाली येण्यास नकार दिला होता.
याप्रकरणी विराली यांनी ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईच आश्वासन दिले होते. या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालेल असा दिलेला शब्द पाळला असून रजिस्ट्रेशन कार्यालयातील विवाह नोंदणी अधिकारी अरूण घोडेकर यांना त्यांनी निलंबित केले आहे.




















