निश्चिन्त राहा आमचे मत राम भाऊंनाच ; होम टू होम प्रचारात नागरिकांची प्रतिक्रिया
भारतीय जनता पार्टी महायुतीचे सोलापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी प्रभाग क्रमांक 9 येथील दत्त नगर परिसरात भाजयुमो पदाधिकारी यांच्यासमवेत होम टू होम प्रचार केला.
याप्रसंगी नागरिकांनी काळजी करू नका,आमचे मत मोदी यांना प्रधानमंत्री बनविण्यासाठी असून, आमचे मत राम सातपुते यांनाच देणार अशी प्रतिक्रिया या भागातील विडी कामगार, गारमेंट व्यवसायिक, दुकानदार व सामान्य नागरिकांच्या होत्या.
याप्रसंगी राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य संजय साळुंखे, माजी नगरसेविका बिर्रु, चिटणीस सावित्रा पल्लाटी, भाजयुमोचे अनिल वंगारी यांच्यासह युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.